उस्मानपुरा पोलीस ठाणे, औरंगाबाद माधव सावरगावे
महाराष्ट्र

औरंगाबाद: तरुणाचे अपहरण करून वडिलांना मागितली लाखोंची खंडणी; दोघांना अटक

तरुणाचे अपहरण करून त्याच्या वडीलांना १० लाख रुपये खंडणी मागणाऱ्या दोघा आरोपीला औरंगाबादच्या (Aurangabad) उस्मानपुरा पोलिसांनी अटक केलीये.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद: घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून एका 35 वर्षाच्या तरुणाचे अपहरण करून त्याच्या वडीलांना १० लाख रुपये खंडणी मागणाऱ्या दोघा आरोपीला औरंगाबादच्या (Aurangabad) उस्मानपुरा पोलिसांनी अटक केलीये. (Aurangabad Crime News)

शिवाय, आरोपीच्या ताब्यात असलेल्या पीडित मुलाची सुखरुप सुटकाही केली. शामराव सीताराम पवार, शेख फय्याजोद्दीन सेख मेहराजोद्दीन अशी आरोपींची नावे आहेत. औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा भागात राहणाऱ्या मधुकर लहानू अवचरमल यांनी २१ मार्च रोजी पहाटे पोलिसांत (Police) तक्रार दिली होती.

त्यात तुमच्या मुलाला आम्ही जालना येथे घेऊन आलो आहोत, तुमचा मुलगा तुम्हाला परत हवा असेल तर सकाळी जालन्यात १० लाख रुपये घेऊन याल अशी खंडणीची धमकीचे फोन आल्याचे म्हटले होते. त्यावरुन एक पथक जालन्याला पाठवून अपहरण झालेला मुलगा किशोर अवचरमल याची आरोपीच्या तावडीतून सुखरुप सुटका करत दोन आरोपींना अटक केली.

हे देखील पहा-

अपहरण झालेल्या किशोर याने घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आरोपींनी पैसे वसुल करण्यासाठी अपहरण करण्याची शक्कल लढविल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

SCROLL FOR NEXT