औरंगाबाद: नांदायला येत नाही; नवऱ्यानेच केली बायकोची बदनामी माधव सावरगावे
महाराष्ट्र

औरंगाबाद: नांदायला येत नाही; नवऱ्यानेच केली बायकोची बदनामी

नांदायला येत नाही म्हणून नवऱ्यानेच बायकोची सोशल मीडियावर बदनामी केल्याची घटना औरंगाबादेत घडली आहे.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद: नांदायला येत नाही म्हणून नवऱ्यानेच बायकोची सोशल मीडियावर Social Media बदनामी केल्याची घटना औरंगाबादेत Aurangabad घडली आहे. प्रकारामुळे स्वतःच्या पत्नीची बदनामी करणारा पती सायबर पोलिसांच्या Cyber Police जाळ्यात अडकला आहे.

हे देखील पहा -

का घडला प्रकार;

पतीच्या संशयी वृत्तीला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. अनेकदा विनंती केल्यावरही ती नांदायला आली नाही. त्यातून वाद वाढत गेला अन् तिने महिला तक्रार निवारण केंद्रात धाव घेतली. त्यांचे फारकतीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच आता तिला अद्दल घडवायचीच असा निश्चय करून पतीने तिची सोशल मीडियावर बदनामी सुरू केली.

हा प्रकार लक्षात आल्यावर पत्नीने ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मुकुंदवाडीतून पतीला बेड्या ठोकल्या. आरोपी पती आणि पत्नी यांचा 2007 साली विवाह झाला आहे. त्यांना 15 आणि 12 वर्षांची दोन मुले आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मराठा आरक्षणाचा जीआर मागे घ्या, अथवा बदल करा, छगन भुजबळांची मागणी

'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

Actor Death Threats : जर तुझ्या आई, बहिणीला काहीही सांगितलंस...; प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Chanakya Niti : ही ३ गुपितं कोणालाही सांगू नका; नाहीतर जवळचे मित्रसुद्धा होतील शत्रू

Nepal Protest : नेपाळ पेटलं! माजी मंत्र्याचे घर पेटवलं, राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT