Aurangabad News Saam TV
महाराष्ट्र

शेती मालकाने लढवली अनोखी शक्कल; कपाशी आणि तूरीमध्ये केली गांजाची लागवड, पण...

का शेतकऱ्याने आपल्या दोन एकर क्षेत्रातील कपाशी व तूर पिकांमध्ये चक्क गांजाची लागवड केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडीया -

औरंगाबाद: शेतीत फायदा मिळत नाही त्यामुळे रानामध्ये गांजाची लागवड करायची का? असा सवाल अनेक संतप्त शेतकरी विचारत असतात. शिवाय मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या एका शेतकऱ्यांने तर थेट मुख्यमंत्र्यांना शेतामध्ये गांजा लावण्याची परवानगी द्या अशा आशयाचं पत्र लिहलं होतं.

याबाबतच्या बातम्या देखील आपण वाचल्या होत्या मात्र आता एका शेतकऱ्याने आपल्या दोन एकर क्षेत्रातील कपाशी व तूर पिकांमध्ये चक्क गांजाची लागवड केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

पाहा व्हिडीओ -

ही घटना सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारात उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तब्बल तीन तास कारवाई करत 63 किलो 950 ग्रॅम गांजाची झाडं जप्त करून तीन लाख वीस हजार 950 रुपयांचा मुद्देमाल शेतातून जप्त केला आहे.

याप्रकरणी शेतात झाडे लावून बसलेल्या सुभाष महाजन या संशयित शेतकऱ्याला सोयगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता शेतामध्ये गांजाची शेती करण्याच्या प्रकरणामध्ये वाढ होत असून ही चिंतेची बाब असल्याचं मतं नागरिक व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT