Aurangabad: पगाराचे पैसे आईकडे देतो तू तिच्याकडून घे, पत्नीला आला राग थेट पतीवर केले वार SaamTvNews
महाराष्ट्र

Aurangabad: पगाराचे पैसे आईकडे देतो तू तिच्याकडून घे, पत्नीला आला राग थेट पतीवर केले वार

पत्नीने पतीच्या पोटात चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबाद: धक्कादायक तुमच्या पगाराचे (Salary) पैसे माझ्याकडे देत जा म्हणत पत्नीने (Wife) पतीच्या पोटात चाकूने (knife) वार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad) समोर आली आहे. पतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, निजामोद्दीन हे बँकेत (bank) नोकरीला आहे. काल त्यांच्या पत्नीने आपण वेगळे राहू आणि तुम्ही तुमच्या पगाराचे सर्व पैसे माझ्याकडे देत जा, असा आग्रह केला होता. (Aurangabad Crime The wife got angry attacked husband directly)

हे देखील पहा-

यावेळेस निजामोद्दीन यांनी आईचे कारण दाखवून आपण सर्व सोबतच राहू आणि पगाराचे पैसे मी आईकडे देतो, तुला लागले तर त्यांच्याकडून घेत जा असे सांगितले होते. यावरून दोघा नवरा- बायकोमध्ये वाद झाले वाद एवढा टोकाला गेला की, निजामोद्दीन यांच्या पत्नीने किचनमध्ये भाजी कापण्याच्या चाकूने त्यांच्या पोटावर वार केला आहे. त्यांनी स्वतःचा बचाव केला आहे.

मात्र, त्यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. बायकोच्या या कृत्यामुळे निजामोद्दीन यांनी सातारा (Satara) पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दिली आहे. तर पोलिसांनी त्यांना घाटी रुग्णालयात (hospital) उपचारासाठी पाठवले होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस (Police) केट आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Shocking News : कबड्डी खेळताना खेळाडू मैदानात कोसळला अन् मृत्यू झाला , धक्कदायक कारण आलं समोर

Actress Opps Movement: 'आज तरी पूर्ण कपडे...'; प्रसिद्ध अभिनेत्री झाली ऊप्स मूव्हमेंटची शिकार

Side effects of earbuds use: २ वर्षे इयरबड्स वापरले, कान खराब झाले; धोका टाळण्यासाठी काय कराल?

कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी कपातीचे संकट! 'या' दिवशी १२ तास पाणी येणार नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT