Aurangabad Crime Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad Crime : महिलांकडे बघून करायचा अश्लील चाळे; पोलिसांनी सिंघम स्टाईलने केली धुलाई

शेख रहीम शेख अजीज (वय 21) असे या रोडरोमियोचे नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : पोलीस काय करू शकतात याचा नुकताच प्रत्यय एका रोडरोमियोला आला आहे. उस्मानपुरा पोलिसांनी या रोडरोमियोला चांगलाच इंगा दाखवलाय. हा रोडरोडमियो महिलांना बघून अश्लील चाळे करायचा. याबाबतची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी सिंघम स्टाईल कारवाई करत त्याची चांगलीच धुलाई केली. तसेच त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. (Aurangabad Crime News)

शेख रहीम शेख अजीज (वय 21) असे धुलाई करून अटक केलेल्या रोड रोमिओचे नाव आहे. आरोपी रहीम हा उस्मानपुरा परिसरातील देवानगरीत राहतो. गेल्या काही दिवसांपासून तो रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना बघून अश्लील चाळे करायचा. मंगळवारी देखील आरोपीने एका तरुणीकडे पाहून अश्लील चाळे केले.

मात्र भितीपोटी कुणीही त्याची तक्रार द्यायला समोर येत नव्हतं. दरम्यान, याबाबतची माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली. यानंतर असा प्रकार घडला तर थेट आम्हाला कॉल करा असे पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी परिसरातील नागरिकांना तसेच महिलांना सांगितले होते. (Aurangabad Todays News)

दरम्यान, मंगळवारी, पुन्हा आरोपी तरुण रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढत होता. याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बागवडे यांनी पथकासह घटनास्थळ गाठलं. त्यावेळ तिथे उपस्थित असलेल्या आरोपी शेख रहिमची त्यांनी खात्री केली. आणि घटनास्थळी महिलांसमोरच त्याची चांगलीच धुलाई केली.

त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध महिलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विकृत मनोवृत्तीचा असून त्याने याआधी देखील महिला तरुणी दिसल्यानंतर अश्लील चाळे केले होते. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवली रेल्वे स्थानकातून राजू पाटील शेकडो मनसैनिकांसह ट्रेनने मुंबईकडे रवाना

मोदी सरकारचं गिफ्ट! ५ टक्के व्याजावर ३ लाखांचं कर्ज; काय आहे सरकारची योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

Gold Price Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल; 18, 22 आणि 24 कॅरेट किती रुपयांनी स्वस्त? आताच घ्या जाणून

'दृश्यम' चित्रपट पाहिला, २००० किमी प्रवास केला अन्…; बापाला संपवल्याचा रचला बनाव, पण एका कॉलने सगळा प्लॅन उधळला

BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT