Aurangabad Crime Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime : गर्लफ्रेंडचे लाड पुरवण्यासाठी 'ते' करायचे नको ते उद्योग, असे अडकले जाळ्यात

प्रेयसीखातर तरुण कोणत्याही थराला जाऊ शकतात असे म्हणतात. याचाच प्रत्यय औरंगाबद शहरात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Aurangabad Crime News : प्रेम आणि प्रेयसीखातर तरुण कोणत्याही थराला जाऊ शकतात असे म्हणतात. याचाच प्रत्यय औरंगाबद (Aurangabad) शहरात आला आहे. पंचवीशीतील तीन तरुणांनी आपल्या प्रेयसींचे लाड पुरविण्यासाठी चक्क दुचाकी चोरल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही तर तिघांनी मिळून अनेक दुचाकी चोरी केल्या आणि त्या विकल्या देखील.

औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून तब्बल नऊ लाख रुपये किंमतीच्या 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. नारायण भंडारे, कृष्णा होळकर,अर्जुन वाकळे अशी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची नवे आहेत.

चोर करून आपण आपल्या प्रेयसींना हवी ती भेटवस्तु देऊ शकतो, असे ठरवत तिघांनी एकमत केले. या नंतर तिघेही औरंगाबाद येथील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी करायचे. तिघांनाही दारूचे देखील व्यसन आहे. चोरी करण्या अगोदर तिघेही मद्य प्रशान करून चोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

दुचाकी चोरी केल्यानंतर चोरी केलेली दुचाकी तिघेही ग्रामीण भागात विकायचे आणि त्यातून मिळालेल्या पैशातून तिघेही त्यांच्या प्रेयसींच लाड पुरवायचे. एक दोन वेळा चोरी केल्या नंतर त्यांना आपण पकडले जाणार नाही, असा गैरसमज झाला आणि त्यामुळे तिघांनीही अनेक दुचाकी चोरल्या त्या विकल्या. मात्र, या घटनेची कुणकून गुन्हे शाखेचे उप निरीक्षक गजानन सोनटक्के यांना झाली होती. त्यानंतर खबऱ्यांना कामावर लावत त्यांनी या तिघांची माहिती काढील. तिघांना तब्यात घेत विचारपूस केली असता या तिघांनी चोरीची कबुली देत प्रेयसींचे लाड पुरविण्यासाठी चोरी करत असल्याचे पोलिसांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manohar Bhosale: भोंदू महाराज मनोहर भोसलेचा नवा करनामा;प्रसाद म्हणून आंबा,पेरू तीन हजार रुपयाला विकायचा

मंत्री नितेश राणेंना एक महिन्याचा कारावास, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kaju Katli History: काजू कतली कुठून आली? मिठाईचा शोध केव्हा आणि कसा लागला?

Maharashtra News Live Update: भोंदू राजेंद्र गडगे याला आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी

Sugar Free Tea Recipe: घरच्याघरी बिनसाखरेचा चहा कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT