Aurangabad News
Aurangabad News  Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad News: धक्कादायक! बारावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या काही तासाआधीच उचललं टोकाचं पाऊल; औरंगाबादेत खळबळ

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Aurnagabad News : औरंगाबादमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादमध्ये परीक्षेच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या काही तासाआधीच जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. ही घटना एन ८, सिडको भागातील गुरुनगर हौसिंग सोसायटीमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

बारावीची परीक्षा आज, २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. बारावीच्या परीक्षा (Exam) देण्यासाठी हजारो विद्यार्थी सज्ज झाले आहेत. मात्र, बारावीची परीक्षा सुरू होण्याआधी दुर्देवी घटना घडली आहे. परीक्षा अवघ्या २४ तासांवर ठेपलेली असताना एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

औरंगाबादच्या (Aurngabad) एन.८ सिडको भागातील गुरुनगर हौसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. सोमवारी २० फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. विद्यार्थ्याने परीक्षेच्या तणावातून जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांसह नातेवाईकांनी वर्तवला आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आमन रविंद आहेरेवाल असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

20 वर्षीय विवाहितेची राहत्या घरात आत्महत्या

बीडमध्ये २० वर्षीय विवाहित महिलाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील गुंजथडी गावात उघडकीस आली आहे. जयश्री विष्णु शहाणे वय २० असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.

मृत जयश्रीचा ६ महिन्यापूर्वी गुंजथडी येथील विष्णू शहाणे यांच्याशी विवाह झाला होता. अचानक जयश्रीने राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण पोलीस तपासात समोर आले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT