Aurangabad Crime News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime News: वाढदिवस साजरा करताना धक्काबुक्की; मामाने केला भाच्याचा खून

वाढदिवस साजरा करताना धक्काबुक्की; मामाने केला भाच्याचा खून

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : वाढदिवस साजरा करताना झालेल्या धक्काबुक्कीतून मामाने भाच्याला चाकूने भोसकल्याची घटना औरंगाबाद (Aurangabad) शहरातील किराडपुरा भागात उघडकीस आलीय. यात भाच्‍याचा मृत्‍यू झाला आहे. तर अन्‍य तीन जखमी झाले आहेत. (Tajya Batmya)

औरंगाबाद शहरातील किराडपुरा भागातील रहमान या कॉलनीत सुलेमान इम्रान चौक या पाच वर्षीय बालकाचा वाढदिवस साजरा झाला. यानंतर परिसरातील काही नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाली. यामध्ये आरोपींनी धारदार चाकू व रॉडने (Crime News) मयत सय्यद साजिद सय्यद पाशा याला मारहाण केली. यात त्‍याचा मृत्यू झाला. तर अन्य तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन आरोपी ताब्‍यात

सदर प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अझहर पठाण आणि अरबाज पठाण या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास जीन्सी पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT