Auranagabad News  Saam TV
महाराष्ट्र

Auranagabad : सैन्यात भरती व्हायचं स्वप्न राहुनच गेलं! Whats App स्टेटस ठेवत तरुणाने संपवली जीवनयात्रा

सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.

साम टिव्ही ब्युरो

Auranagabad News : औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बिडकीन एमआयडीसी (Aurangabad) परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ओमकार नारायण डांगरे (वय २१ वर्षे) असं मृत तरुणाचं नाव आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, ओमकार हा घरी काहीही न सांगता बुधवारी सकाळीच घराबाहेर पडला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे ओमकारच्या आई-वडीलांनी त्याचा शोधाशोध घेतला. मात्र, ओमकार कुठेही आढळून आला नाही. अखेर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

दरम्यान, पोलिसांनी ओमकारचा शोधाशोध घेतला असता, त्याच्या मोबाईलचे लोकेशन डीएम आयसी औद्योगिक वसाहतीत मिळून येत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तिथे जाऊन शोध घेतला असता, एका विहिरीजवळ त्याची गाडी आणि चप्पल आढळून आली. पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केलं.

अखेर ओमकारचा मृतदेह विहिरीत आढळून आला. ओमकार याने त्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप स्टेटस वर "I just feel like if I died everything will be ok:) " अशा प्रकारे स्टेटस ठेवत आपली जीवनयात्रा संपवली आहे. ओमकार डांगरे हा पोलीस व सैनिकी भरती तसंच शासकीय नोकरीची तयारी करत होता अशी माहिती मित्रांच्या वतीने देण्यात आली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT