औरंगाबाद : मंत्री आदित्य ठाकरेंच्या स्वागत समारंभात कोरोना चेंगरला!  SaamTVNews
महाराष्ट्र

औरंगाबाद : मंत्री आदित्य ठाकरेंच्या स्वागत समारंभात कोरोना चेंगरला!

पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी औरंगाबाद जिल्ह्यात मोठी गर्दी झाली होती. या गर्दीने कोरोना नियमांचा अक्षरशः फज्जा उडवल्याचे दिसून आले.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी औरंगाबाद जिल्ह्यात मोठी गर्दी झाली होती. या गर्दीने कोरोना (Corona) नियमांचा अक्षरशः फज्जा उडवल्याचे दिसून आले. गर्दी टाळा, कोरोना पासून दूर राहा, असं सांगत गर्दीपासून दूर राहणारे आदित्य ठाकरे आज मात्र अजिंठ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील अनेक गावात गर्दीत शुभेच्छांचा स्वीकार करीत होते. यावेळी पोलिसांची मोठी दमछाक झाली.

हे देखील पहा :

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे वेरूळ लेणीची पाहणी करून अजिंठा लेणीकडे निघाले होते. औरंगाबाद (Aurangabad) ते जळगाव या रस्त्यावर सिल्लोड तालुक्यात अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून आदित्य ठाकरेंवर पुष्पवृष्टी केली. ढोल ताशे आणि फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अजिंठा लेणीच्या परिसरामध्ये गर्दीच गर्दी झाली होती. या गर्दीतच लोकांच्या शुभेच्छांचा स्वीकार त्यांनी केला, हारतुरे घेतले.

यावेळी सिल्लोड सोयगाव तालुक्यातील शिवसेनेचे (Shivsena) नेते, कार्यकर्ते त्यासोबतच अंगणवाडी सेविका, आशा सेविका त्यांच्या स्वागतासाठी उभ्या ठाकल्या होत्या. या दौऱयात त्यांनी वेरूळ आणि अजिंठ्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकार वेगळ्या उपायोजना करीत असल्याचं सांगितले. शिवाय पर्यटकांना सुविधा पुरवण्यासाठी काम करीत आहे, त्यासोबतच पर्यटनस्थळी प्रदूषण होऊ नये म्हणून इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निकृष्ट काम केल्याने ठेकेदाराला १० लाख रुपयांचा दंड

RCB vs GT Final : पावसामुळं फायनल रद्द झाली तर कोण ठरणार IPL विजेता, जाणून घ्या नियम

Smoothening VS Keratin: केस खूप ड्राय आणि फ्रिझी झालेत? केसांसाठी कोणता ट्रीटमेंट फायदेशीर? जाणून घ्या

गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत आठ शेळ्या जळून खाक, शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

Dog Bark Safety: 'या' ४ वस्तू जवळ ठेवा, कुत्रा कधीच हल्ला करणार नाही

SCROLL FOR NEXT