Shankarrao Gadakh Saam Tv
महाराष्ट्र

मंत्री शंकरराव गडाखांसह मुलाच्या हत्येचा कट; ऑडिओ क्लिप व्हायरल

२१ इस्रायली बनावटीच्या पिस्तुल आणल्याचा उल्लेख व्हायरल क्लिपमध्ये आहे.

साम टिव्ही ब्युरो

अहमदनगर: शिवसेनेचे (Shivsena) मंत्री शंकरराव गडाख (Shankarao Gadakh ) यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबाराचं प्रकरण ताजे असतानाच आता मंत्री गडाख व त्यांचे पुत्र उदयन यांच्यावर गोळी झाडण्या संदर्भात संभाषण असणारे ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यासाठी २१ इस्रायली बनावटीच्या पिस्तुल आणल्याचा उल्लेख व्हायरल क्लिपमध्ये असल्याने पोलिसांसमोर (Police) तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे आपण पोलीस डिपार्टमेंटलाही सापडणार नाही असा दावा यातील व्यक्ती ऑडिओ क्लिपमध्ये करत आहे. ऑडिओ क्लिप मधील व्यक्ती अद्याप कोण हे समजू शकलेलं नाही.

मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर नेवासा तालुक्यातील लोहगाव शिवारात काही गुंडांनी पाच गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील दोन गोळ्या राजळे यांच्या शरीरात घुसल्या आहेत. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहे. या प्रकरणात चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून एकाला पोलिसांनी (Police) अटक केली आहे. पण आता एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

या क्लिपमध्ये मंत्री गडाख आणि त्यांचे पुत्र उदयन यांना ठार मारून टाकेन असा उल्लेख आहे. यासाठी अनधिकृतपणे इस्रायली बनावटीचे २१ पिस्तूल आणल्या असून, त्यापैकी २१ पिस्तूल आधीच वाटल्या असल्याचा उल्लेख आहे.तर एक पिस्तुल माझ्याजवळ आहे. ऑडिओ क्लिप मध्ये अज्ञात व्यक्ती बोलत आहे. आता २० पिस्तूल नेवासा तालुक्यात कोणाकोणाला वाटल्या आहेत, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर (Police) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला अचानक आग

SCROLL FOR NEXT