विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

धक्कादायक! लातुरात वरिष्ठांचा त्रासामुळे कर्मचाऱ्याचा विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न

प्रकृती चिंताजनक, शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

दीपक क्षीरसागर

लातूर: इंडसटॉवर ॲथोराईज एरियल टेलिकॉम सोल्यूशन कंपनीतील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका कर्मचाऱ्याने केलाय. भरत देशमुख असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Latur Latest News In Marathi)

कंपनीत टेक्निशियन म्हणून काम;

भरत देशमुख मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. ते 2019 पासून इंडसटॉवर ॲथोराईज एरियल टेलिकॉम सोल्यूशन कंपनीत लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे इंडसटॉवर ॲथोराईज एरियल टेलिकॉम सोल्यूशन कंपनीत टेक्निशियन म्हणून काम पाहतात. आठ हजार पाचशे रुपये त्यांना मासिक वेतन मिळते. या तुटपुंज्या वेतनावर भरत देशमुख आपल्या संसाराचा गडा कसाबसा ओढत आहेत. पत्नी, दोन मुलं आणि आई - वडील यांची जबाबदारी भरत देशमुख यांच्यावर आहे.

हे देखील पहा-

हप्ता नाही दिल्यास...;

भरत देशमुख यांना त्यांचे वरिष्ठ वारंवार त्रास द्यायचे, साईटवरील साहित्याची मागणी केली असता भरत देशमुख याना वरिष्ठांकडून हप्ता मागितला जात असे. हप्ता नाही दिल्यास त्यांच्या कामाचा खराब अहवाल कंपनीला पाठविला जात, असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने भरत देशमुख यांनी त्रासाला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येतात इतर सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टर सांगत आहेत असे भरत देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Health Care Tips: हिवाळ्यात हे सुपरफूड्स खा; सर्दी- खोकल्यापासून मिळेल आराम

Dhule News: गावातील मुलांना नोकरी का देत नाही?, धुळ्यातील टोलनाक्यावर तुफान राडा, १२ जणांविरोधात गुन्हा

Maharashtra News Live Updates: जुनी विधानसभा आज बरखास्त होणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

SAIL Recruitment: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

बदाम-पिस्ता नाही तर तुपात भाजलेला 'हा' पदार्थ कोलेस्ट्रॉल करेल कमी, आजच वापरा

SCROLL FOR NEXT