धक्कादायक! Youtubeवर व्हिडिओ पाहून गर्भपात करण्याचा प्रयत्न फसला Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! Youtubeवर व्हिडिओ पाहून गर्भपात करण्याचा प्रयत्न फसला

नागपूरच्या यशोधरा नगर येथील धक्कादायक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर - युट्युबवर Youtube व्हिडीओ पाहून अनेक जण वेगवेगळे प्रयोग करतात. अनेकदा आपण ते प्रयत्न फसलेले देखील पाहिले आहे. असाच काहीसा प्रकार नागपूरमधील एका तरुणीने करण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूरच्या Nagpur यशोधरा नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

हे देखील पहा -

एका बलात्कार पीडित तरुणीने गर्भवती झाल्यावरती गर्भपात करण्यासाठी युट्यूब व्हिडिओ पाहिला आणि गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या तरुणीची प्रकृती अचानक बिघडली आणि हा सगळा प्रकार उघड झाला. नागपूरच्या यशोधरा नगर येथील हा प्रकार आहे. अब्दुल खान असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी आणि पीडित तरुणीची एकमेकांसोबत मैत्री होती. याच मैत्रीचा फायदा उचलत आरोपीने एकदा पीडित मुलीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. इतकेच नव्हे तर या तरुणीचा व्हिडिओ तयार करून तिच्यावर तीन ते चार वर्ष अत्याचार केला. या संबंधातून ती गर्भवती राहिली.सहा महिन्याचे गर्भ पाडण्यासाठी तिने युट्यूब व्हिडिओ पाहून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर तिला त्रास सुरू झाला. घरच्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले असता हा संपूर्ण प्रकार समोर आला. दरम्यान, या प्रकरणी पीडित मुलीच्या घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

'शिवाजी कोण होता?'चं बनावट पुस्तक? पानसरेंच्या पुस्तकाचं परवानगीविना प्रकाशन?

SCROLL FOR NEXT