Ahmednagar News Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर भर चौकात प्राणघातक हल्ला; परिसरात खळबळ

Ahmednagar Crime News: सावेडी उपनगरातील एकविरा चौकात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Shivani Tichkule

सुशील थोरात

Ahmednagar News: अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात सावेडी उपनगरातील एकविरा चौकात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास घटना ही घडली. (Latest Marathi News)

अंकुश चत्तर असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. धारदार शस्त्राने वार केल्याने अंकुश हे गंभीर जखमी झाले. सध्या यांच्यावर खासगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू. तीन जणांनी अंकुश चत्तार यांच्यावर वार केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. मात्र हा हल्ला नेमकी कशामुळे झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Ahmednagar News)

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस घटना स्थळाची पाहणी करत असताना त्या ठिकाणी काही अंतरावर असलेली एक चहाची टपरी अज्ञातांनी पेटवून दिली. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती तोफखाना पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT