नुसत्या चप्पलवरून ATM फोडणारे भामटे २४ तासांच्या आत जेरबंद ! गोपाल मोटघरे
महाराष्ट्र

नुसत्या चप्पलवरून ATM फोडणारे भामटे २४ तासांच्या आत जेरबंद !

बनावट चावी आणि पासवर्ड टाकून एटीएम मधील लाखोंची रोकड लुटणाऱ्या चोरांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हेगाराने घातलेल्या चप्पलवरून २४ तासांच्या आत जेरबंद केलं आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : शहरातील भोसरी परिसरात असलेले दि सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम फोडल्याची घटना सकाळी उघडकीस आली होती. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की बनावट चावी आणि पासवर्ड वापरून चोरी करणारा कुणीतरी बँकेचा कर्मचारीच असावा त्यानुसार त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.

हे देखील पहा -

मात्र कुणीही खरे बोलत नव्हते. तेव्हा पोलिसांनी चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज बारकाईने तपासले आणि त्यामध्ये दिसणाऱ्या आरोपीने जी चप्पल घातली होती तशीच चप्पल चौकशीसाठी बोलावलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकजण घालून आला होता ! तेव्हा पोलिसांनी त्या व्यक्तीला बाजूला घेत पोलीसी खाक्या दाखवल्या आणि या प्रकरणाचं बिंग फुटलं.!

एटीएम फोडणारा चोरटा दि सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेचाच कर्मचारी असून रोहित गुंजाळ असे त्याचे नाव असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी रोहित याने आपल्या इतर साथीदारांसोबत मिळून हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. तर या आरोपीने या आधीही बँकेच्या लाखो रुपयांची अफरातफर केली असून त्या संदर्भात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.

Edited By : Krushnnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट; समस्या सोडवण्याचे आश्वासन

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT