ATM क्लोन करणारी टोळी यवतमाळ पोलिसांच्या जाळ्यात; Bihar मधून दोघांना अटक! संजय राठोड
महाराष्ट्र

ATM क्लोन करणारी टोळी यवतमाळ पोलिसांच्या जाळ्यात; Bihar मधून दोघांना अटक!

यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून एसबीआयच्या (SBI) एटीएम मधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांचे एटीएम (ATM) क्लोन केले जात होते. तब्बल पंधरा जणांच्या एटीएमचे क्लोन करून पैसे परस्पर काढण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून एसबीआयच्या (SBI) एटीएम मधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांचे एटीएम (ATM) क्लोन केले जात होते. तब्बल पंधरा जणांच्या एटीएमचे क्लोन करून पैसे परस्पर काढण्यात आले. या गुन्ह्याचा सायबर (Cyber) टीमने शोध घेऊन क्लोन करणारी टोळीच बिहारच्या गया या जिल्ह्यातून जेरबंद केली. सुरेश कुमार अनिल सिंग व सुधीर कुमार निर्मल पांडे दोघेही राहणार गया, राज्य बिहार अशी आरोपींची नावे आहेत.

हे देखील पहा :

यवतमाळ येथील सत्य साई ज्योत मंगल कार्यालयाजवळ च्या एटीएममध्ये त्या पाठोपाठ अँग्लो हिंदी हायस्कूल च्या एसबीआय एटीएममध्ये पैसे काढण्याचे कार्ड क्लोन केले. या आरोपींनी एटीएम मशीनमध्ये इंटरनल एटीएम स्कॅनर बसवले होते. त्यानंतर ते हॅन्ड एटीएम तयार करत होते. अशी १५ एटीएम कार्ड तयार करून त्यांनी बँक (Bank) खात्यातील रक्कम काढली. या संदर्भात यवतमाळच्या (Yavatmal) अवधूतवाडी पोलीस (police) स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या टोळीने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड येथेही अशाचप्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलीसांनी आरोपी कडून इंटरनल एटीएम स्कॅनर १, हॅन्ड एटीएम स्कॅनर १, बनावट एटीएम तयार करण्यासाठी लागणारे स्किमर तसेच १५ एटीएम सह इतर साहित्य व नगदी एक लाख २८ हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT