Maval News दिलीप कांबळे
महाराष्ट्र

कामशेत येथे कोंबड्या चोरांचा कहर, चोरट्यांनी लुटला कोंबड्यांचा टेम्पो

या संदर्भात टेम्पो चालक यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलीप कांबळे

मावळ - मुंबई पुणे महमार्गावरील अहिरवडे फाट्यावर कोंबड्या चोरांनी बॉयलर कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो अडवून टेम्पो चालक व सहचालकास शस्त्रांचा धाक दाखवून कोंबड्यांचा टेम्पो लांपास केल्याची घटना पुढे आली आहे. या संदर्भात टेम्पो चालक यांनी कामशेत पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हे देखील पहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक जमाल अहमद अताउल्ला खान हे कोंबड्या घेऊन मुंबईला घेऊन जात असताना नायगावच्या जवळ एका पांढऱ्यां रंगाच्या बुलेटवर आलेल्या चार अनोळखी इसमांनी टेम्पो रस्त्यात अडवला. त्यानंतर त्यांनी टेम्पोत जबरदस्तीने घुसुन, क्लिनर व चालक यांना कोयत्याचा धाक दाखवत टेम्पो व त्यातील कोंबड्या असा एकुण बारा लाख तीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरी करून पुण्याच्या दिशेने पसार झाले.

या संदर्भात टेम्पो चालकाने कामशेत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कोंबड्यांचा टेम्पो हा पुणे नाशिक महामार्गाजवळ उभा असल्याची माहिती मिळाली आहे. त्यावरून कामशेत पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी चोरी गेलेला टेम्पो मोशी येथून ताब्यात घेतला आहे. गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध कामशेत पोलीस घेत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT