Buldhana Women's Strike saam tv
महाराष्ट्र

देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार, रास्तारोको आंदोलनात शेकडो महिलांचा सहभाग

देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील आव्हा येथील देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुलढाण्यातील अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा प्रेमलता सोनोने यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी (Women's strike) आज रास्तारोको आंदोलन केले. आव्हा येथील देशी दारुच्या दुकान मालकाने एका ग्राहकाला क्षुल्लक कारणावरुन बेदम मारहाण केली. विजयसिंग राजपूत असं मारहाण केलेल्या ग्राहकाचं नाव आहे. विजयसिंगला या मारहाणीत गंभीर दुखापत झाली असून अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. जोपर्यंत देशीदारूच्या दुकान मालकाला अटक केली जात नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यावरुन उठणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्या महिलांनी घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आव्हा येथील देशी दारूच्या (Alcohol shop ban demand) दुकान मालकाने विजयसिंग राजपूत या ग्राहकाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. देशी दारू मालकाची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली असून अनेकांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे देशी दारू दुकान मालकाला तात्काळ अटक करा.

या मागणीसाठी आव्हा येथील शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत देशीदारू दुकान मालकाला अटक केली जात नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी ठाम भूमिका अस्तित्व संघटनेच्या प्रेमलता सोनोने यांच्यासह महिलांनी घेतली आहे. दरम्यान, घटनास्थळावर पोलिसांचा ताफा पोहोचला असून आंदोलकांवर कारवाई केली जात आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT