Udhhav Thackeray Group Saam Tv
महाराष्ट्र

MLA Disqualification Result: आधी धक्का नंतर दिलासा; राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचे आमदारही ठरवले पात्र

Thackeray Group : राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. निकालाच्या शेवटी राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरे गटातील १४ आमदारांबाबत निर्णय दिला.

Bharat Jadhav

Rahul Narwekars Decision on Thackeray Group Mla :

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचं वाचन करत शिंदे गट आणि ठाकरे गटाने दिलासा दिला. विधानसभा अध्यक्षांनी आपला निकाल देताना दोन्ही गटातील आमदार पात्र असल्याचं म्हटलंय. (Latest News)

शिंदे गटाचा दावा राहुल नार्वेकर यांच्याकडून मान्य करण्यात आला. शिंदे गटातील आमदारांना पात्र असल्याचा निकाल देत राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. निकालाच्या शेवटी राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) उद्धव ठाकरे गटातील १४ आमदारांबाबत निर्णय दिला. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी भरत गोगावले यांची प्रतोद पदी नियुक्ती वैध ठरवली. तसेच मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाचे सर्व १६ आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले. याचबरोबर ठाकरे गटासाठी एक मोठा दिलासा मिळाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाचे देखील सर्व आमदार पात्र ठरवलेत. सायंकाळी ५ वाजता नार्वेकरांनी निकालाचं वाचन सुरू केलं. नार्वेकरांनी शिंदे गटाला दिलासा देताना पक्षप्रमुख म्हणून कोणत्याच गटाला सर्वस्वी अधिकार देता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. नार्वेकरांना ठाकरे गटाचे आमदारही पात्र ठरवल्यानं याच्या निकालात उद्धव ठाकरेंना तितकाच एक दिलासा मिळाला.

दरम्यान निकाल दिल्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक प्रतिक्रया दिलीय. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही चोरांच्या हातात देण्याचा अधिकार नार्वेकरांना कुणी दिला? आज जल्लोष करणाऱ्या लोकांच्या म्होरक्यांची अवस्था मुसोलिनीप्रमाणे होईल. नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलाय. निवडणूक आयोग चोरांचे सरदार आहेत, अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी या निकालावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT