महाराष्ट्र

Assembly Election: भाजपचा २ टर्म आमदार, आता तिथंच शिंदेंच्या शिवसेनेचा दावा; नाशिकमध्ये महायुतीत काय घडतंय?

Nashik Politics: नाशिक मध्यच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. भाजपकडे असलेल्या जागेवर शिंदे गटाने दावा केलाय.

Bharat Jadhav

नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीत जागावाटपावरुन वाद होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दावा केलाय. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलीय. पक्षाने संधी दिल्यास नाशिक मध्य विधानसभेतून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं ते म्हणालेत.

दरम्यान भाजपकडे असलेल्या या जागेवर शिंदे गटाने दावा केल्याने शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच होणार असल्याची चिन्हे आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने दावा केल्या जागेवर म्हणजेच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे यांनी दोनदा आमदारकी भुषवलीय. लोकसभा निवडणुकीत अजय बोरस्ते यांनी माघार घेतली होती. त्यामुळे यावेळी ते आपली दावेदारी भक्कमपणे मांडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ अन् मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Maharashtra News Live Update: अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई

Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Mumabi Tourism : गर्दी नाही, गोंधळ नाही; 'येथे' लपलाय अथांग समुद्रकिनारा, जणू मुंबईतला स्वर्गच

SCROLL FOR NEXT