Sanjay Raut On Mumbai University Senate Election Saamtv
महाराष्ट्र

Sanjay Raut: फक्त ५ कोटी दाखवले, १० कोटी झाडी- डोंगरात पोहोचले, राऊतांचे CM शिंदेंवर खळबळजनक आरोप!

Sanjay Raut On Assembly Election 2024: पुण्यामध्ये कारवाई करण्यात आलेली मूळ रक्कम पंधरा कोटी होती आणि फक्त पाच कोटी दाखवले दहा कोटी झाडी आणि डोंगरात व्यवस्थित पोहोचवण्यात आले," असं संजय राऊत म्हणाले.

Gangappa Pujari

Maharashtra Assembly Election 2024: एकीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच पुण्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटी रूपयांची रोख रक्कम पकडली. पोलिसांनी रक्कम जप्त केली पण ज्यांच्याकडे रक्कम होती त्यांच्याकडे चौकशी करुन त्यांना सोडून दिले. ही गाडी सांगोल्यातील असल्याचीही माहिती समोर आली आहे. यावरुनच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत.

संजय राऊतांचे गंभीर आरोप!

"मी आठ दिवसापूर्वी सांगितलं होते शिंदे गटाच्या आमदारांना आणि त्यांच्या इतर काही लोकांना 50 कोटी पेक्षा जास्त रक्कम पोहोचवण्याची सुरुवात झाली आहे. आचारसंहितेच्या आदल्या रात्री मोठ्या रकमा पोहोचवण्यात आल्या आणि त्यानंतर इतर पोहोचवायच्या आहेत आणि ते सुद्धा पोलीस बंदोबस्त. पुण्यामध्ये कारवाई करण्यात आलेली मूळ रक्कम पंधरा कोटी होते आणि फक्त पाच कोटी दाखवले दहा कोटी झाडी आणि डोंगरात व्यवस्थित पोहोचवण्यात आले," असं संजय राऊत म्हणाले.

मंत्रालयातून फोन आला...

"काय झाडी, काय डोंगर यांच्या मतदारसंघात ती रक्कम जाणार होती. जे पोलीस अधिकारी तिकडे होते त्यांना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून फोन आला. तोपर्यंत आमचे कार्यकर्ते तिकडे जमले तो त्यांना पाच कोटी दाखवायला लागले. दहा कोटी डोंगरात पोहोचले. पण निवडणूक आयोग काय करते. निवडणूक आयोग अशा घटनांच्या सरकारच्या डोळे बंद करून झापड लावून बसले आहेत आमच्याकडे हजार रुपये असले तरी पकडतील तुमच्याकडे हजार रुपये कसे होते. हे कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत आम्हाला माहिती आहे.." असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

रोहित पवारही संतापले!

"सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगरझाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ओके करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT