Maharashtra Political News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'निवडणुकीत पैशांचा महापूर, महायुतीकडून ४ हजार कोटींचा चुराडा..' मविआच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Rohit Pawar On Maharashtra Assembly Election 2024: अनेक दिग्गज नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार हे विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरला आले होते.

भारत नागणे

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला 30 ते 40 कोटी रूपयांचे वाटप केले जाणार आहे. एकूण सुमारे 3 ते 4 हजार कोटी रुपयांचा चुराडा होईल. असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पंढरपुरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले रोहित पवार?

राज्याच्या राजकारणात विधानसभेचा रणसंग्राम सुरु आहे. आज अनेक दिग्गज नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार हे विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरला आले होते. यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे असे साकडे विठ्ठल चरणी घातल्याचे सांगितले. तसेच महायुती सरकारवर गंभीर आरोपही केले. या निवडणुकीत 3 ते 4 हजार कोटी रुपयांचा चुराडा होईल, असे ते म्हणाले.

"आमच्याविरोधात दबावतंत्र येणार आहे. गुंडांची ताकद वापरली जाणार आहे. एवढी मोठी महाशक्ती आमच्याविरोधात असतानाही जनता , सामान्य कार्यकर्ता आमच्यासोबत आहे. महाविकास आघाडी 180 जागांवर मुसंडी मारेल. आज संध्याकाळपर्यंत जागा महाविकास आघाडीचे जागा वाटप होईल. सांगोल्यात शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांचे कार्य चांगले आहे. त्यांच्यासाठी आपण प्रचार सभा घेऊ असे सांगत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी आपण ठामपणे असल्याचे यावेळी रोहित पवार यांनी सांगितले.

रोहित पाटील अर्ज भरणार!

दरम्यान, सांगलीच्या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून रोहित आर आर पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत,राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ते निवडणुक लढवत असून आपल्या अंजनी या गावातून ते निघाले आहेत. आबांच्या पश्चात रोहित पाटील पहिल्यांदाच थेट विधानसभा निवडणुकीमध्ये उतरत आहेत. तासगावमध्ये आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य रॅली काढत रोहित पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

SCROLL FOR NEXT