Political uproar in Maharashtra Assembly over Kharat case as opposition demands HIV testing for all visitors linked to the accused. Saam Tv
महाराष्ट्र

'भोंदूबाबामुळे पुरोगामी महाराष्ट्राची बदनामी' खरातचे पाप, सरकारच्या डोक्याला ताप

Ashok kharat Case Hiv Test: भोंदू अशोक खरातचे वेगवेगळे कारनामे समोर येत असतानाच आता या प्रकरणाचे पडसाद थेट विधानभवनात उमटलेत... खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करण्याची मागणी विरोधकांनी केलीय... त्यामुळे खरातमुळे महाराष्ट्राची कशी बदनामी झालीय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्राची मान आता शरमेनं खाली गेलीय... भोंदूबाबा अशोक खरातच्या अघोरी कृत्याचा पाढा आता विधानसभेतच वाचला गेलाय..व़डेट्टीवारांनी तर खरात प्रकरणात नवा बॉम्ब टाकत खरातची आणि त्याला भेटणाऱ्या सर्वांची HIV टेस्ट करा, अशी मागणी केलीय..

दुसरीकडे खरातचे राजकीय कनेक्शन आणि नेत्यांसोबतचे व्हायरल फोटो यामुळे विधानसभेत चांगलाच वाद पेटलाय... ⁠चाकणकरांचा राजीनामा झाला मात्र खरातसोबत ज्यांचे फोटो आहेत त्यांचे राजीनामे कधी होणार? असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला.. तर खरात प्रकरणानं पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणली, अशी संतप्त प्रतिक्रिया भास्कर जाधवांनी दिली...

भोंदूबाबा खरात प्रकरणावरून विधानसभेत प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी खरा प्रश्न आहे ज्य़ा महिलांचं शोषण झालं त्यांना न्याय मिळणार का? पुरोगामी महाराष्ट्रात खरातच्या या पापाच्या धंद्यात सहभागी असणाऱ्या बड्या धेंडांना सरकार जेलची हवा दाखवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OTT Releases: वीकेंडचा काही प्लॅन नाही? मग घरीच OTT वरच्या 'या' ७ जबरदस्त वेब सिरीजचा आनंद घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

संतापजनक! रूम रिकामी ठेवू पण मराठी लोकांना देणार नाही; मुंबईमध्ये शिंदे कुटुंबाला घर नाकारलं

Shocking: खाताना कुरकुरेचा तुकडा श्वसननलिकेत अडकला, तरुणाचा तडफडून मृत्यू

Rajasthan Sandstorm viral Video : भरदिवसा पडला रात्रीसारखा अंधार; थरकाप उडवणारं रेतीचं वादळ, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT