SIT intensifies probe into fake godman Kharat’s alleged links with officials in Nashik land deals. Saam Tv
महाराष्ट्र

खरातचे अधिकारी भक्त SIT च्या रडारवर, खरात होता अधिकाऱ्यांचा दलाल

Ashok Kharat Officer Nexus Sit Investigation Nashik: भोंदू खरातचे आता अधिकारी भक्त एसआयटीच्या रडारवर आलेत..कारण कोट्यवधींची माया जमवताना खरात चक्कं अधिकाऱ्यांचा दलाल बनल्याची चर्चा आहे...मात्र खरातने दलालीतून कसं कोट्यवधींचं काळं साम्राज्य उभं केलं? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

राज्याला हादरवणारी खरात फाईल्स उघडली गेली आणि भोंदू खरातच्या काळ्या कारनाम्यांची मालिकाच समोर यायला सुरुवात झालीय... एसआयटीनं खरातच्या मुसक्या आवळल्यानंतर आता आपला मोर्चा खरातच्या अधिकारी भक्तांकडे वळवलाय....खरातनं ज्योतिषशास्त्राच्या नावानं उभ्या केलेल्या काळ्या साम्राज्यामागे त्याचं प्रशासकीय अधिकाऱ्यांशी असलेलं कनेक्शन असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.. एवढंच नाही तर जमीन खरेदी विक्रीसाठी खरात हाच अधिकाऱ्यांचा दलाल असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय...

नाशिकला 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे... त्यासाठी सरकारनं 66.15 किलोमीटरचा रिंगरोड मंजूर केलाय... यासाठी 915 एकर जमीनीचं अधिग्रहण करण्यात येणार आहे.. ही बातमी बड्या अधिकाऱ्यांनी खरातला दिली... आणि त्यानंतर खरातनं अधिकाऱ्यांच्या मदतीनं मोक्याच्या जागा शोधल्या... शेतजमिनी, प्लॉट बळकावले... आणि रिंगरोडलगत पाथर्डी आणि गौळाणे गावात 30 एकर जमीन स्वतःच्या नावावर केली.. बड्या अधिकाऱ्यांना जमिनी मिळवून देण्यासाठी खरातनं एक प्रकारे दलाल म्हणून काम केलंय

त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भातील रिंग रोडची माहिती कुणी फोडली? भोंदू खरातला कोणते अधिकारी सरकारची गुप्त माहिती देत होते... या चौकशीबरोबरच खरातच्या जमीन खरेदी विक्रीत आणि कोट्यवधींच्या काळ्या साम्राज्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांचा काळा पैसा लावण्यात आलाय का? याचीही चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांच्याही मुसक्या आवळायला हव्यात...त्यामुळे एसआयटीचे अधिकारी या प्रकरणी एखाद्या दुय्यम अधिकाऱ्याला बळीचा बकरा बनवणार की सत्य शोधून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणार... याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट? नेमकं कारण आले समोर

Indian Railway: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; पुन्हा जेवण मिळणार गरमा-गरम

Kharat Case : त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही...भोंदू अशोक खरातवरून विधानसभेत खडाजंगी, कोण काय म्हणालं? VIDEO

सोनं 56 हजारांवर येणार? आणखी 40 टक्क्यांनी सोन्याचे दर घटणार?

OTT Release This Week: या आठवड्यात मनोरंजनाचा डबल डोस; 'हे' चित्रपट आणि वेब सिरीज होणार प्रदर्शित

SCROLL FOR NEXT