Shirdi hotel under spotlight after reports of secret meeting between officials and Ashok Kharat before his arrest. Saam Tv
महाराष्ट्र

खरातच्या दरबारी बडे-बडे अधिकारी; अटकेच्या आधी भोंदूबाबासोबतच्या बैठकीत ते सरकारी अधिकारी कोण? स्पेशल रिपोर्ट

Ashok Kharat Case 3 Government Officials Meeting Before Arrest: आता भोंदूबाबा अशोक खरातचं काळं साम्राज्य उभं करण्यासाठी मदत करणाऱ्या 3 शासकीय अधिकाऱ्यांनी अटकेआधी बैठक घेतल्याचं समोर आलंय... मात्र खरातसोबत बैठक घेणारे 3 अधिकारी कोण? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Bharat Mohalkar

ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्माच्या नावावर महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू खरातनं कोट्यवधींची माया जमवत साम्राज्य उभारलं. त्यासाठी शासकीय अधिकारी, राजकीय नेते, अनेक मोठ्या सेलिब्रेटींना हाताशी धरलं... मात्र महिला अत्याचार प्रकरणात खरातच्या मुसक्या आवळल्या... आणि त्याच्या काळ्या कारनाम्यांचं बिंग फुटलं...

दुसरीकडे ठाकरेसेनेचे नेते भास्कर जाधवांनीही या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी अडकल्याचा दावा केलाय..

राज्यातील बडे अधिकारी नराधम कॅप्टन खरातच्या दरबारात जाण्यामागचं कारण होतं... चॉईस पोस्टिंग, बदल्या आणि बढतीचं गणित.....त्यासाठी खरातला दक्षिणा कशी दिली जात होती? पाहूयात... कामाच्या मोबदल्यात खरातला जमिनीतील गुंतवणुकीच्या स्वरूपात ‘दक्षिणा’ दिली जात असे... अनेक वेळा तर अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावावर खरातने अनेक ठिकाणी जमिनींची खरेदी-विक्री केल्याचा संशय आहे.. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी प्रामुख्याने पाथर्डी-गवळाणे, सिन्नर परिसर, शिर्डी-ओझर पट्टा या परिसरात गुंतवणूक केली आहे.

या संपूर्ण प्रकरणात एका बड्या शासकीय अधिकाऱ्याकडे संशयाची सुई वळलीय. मुंबईतील एक डेप्युटी कलेक्टर खरातला सातत्याने पडद्यामागून मदत करत असल्याची चर्चा रंगलीय... तसचं खरातची अटक टाळण्यासाठी वकील पुरवण्यापासून ते आर्थिक रसद पुरवण्यापर्यंत हाच अधिकारी हालचाल करत असल्याची माहिती समोर आलीय.. मात्र खरातला गोरगरिब शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्यासाठी, जमीन खरेदीच्या माध्यमातून साम्राज्य उभी करण्यासाठी मदत करणारे आणि खरातच्या अटकेआधी शिर्डीतील हॉटेलमध्ये बैठक घेणारे शासकीय अधिकारी कोण? यामागचं सत्य समोर येण्यासाठी एसआयटीनं आणखी सखोल तपास करायला हवा... आणि खरातचं साम्राज्य उद्ध्वस्त करुन त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही बुरखा टराटरा फाडायला हवा....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणच्या हल्ल्यांमागे चीनचा हात ? इराण-अमेरिका युद्धात चीनची उडी ?

Sunday Horoscope : प्रेमसंबंध सुधारतील, आर्थिक लाभ होईल; कर्कसह ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Maharashtra Live News Update: अखेर ७ तासानंतर अशोक खरातची SIT चौकशी संपली

LPG Crisis: राज्यांसाठी LPG कोटा ५० टक्क्यांनी वाढवला; स्थलांतरित मजुरांना ५ किलोचे सिलिंडर मिळणार, मोदी सरकारची मोठी घोषणा

इराणविरोधातील युद्धात अमेरिकेची दुटप्पी भूमिका, डोनाल्ड ट्रम्प युद्धविरामाच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT