SIT intensifies probe into Kharaat case as political links surface, raising pressure on former minister Deepak Kesarkar. Saam Tv
महाराष्ट्र

'शिक्षण खातं खरातबाबा चालवायचा', चाकणकरांनंतर आता दुसरी विकेट कुणाची पडणार?

Ashok Kharaat Case Sit Probe Deepak Kesarkar Links: विकृत अशोक खरातच्या मुसक्या आवळल्यानंतर काळ्या कारनाम्यांचं बिंग फुटलं. त्यानंतर रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला...मात्र आता चाकणकरांनंतर माजी मंत्री दीपक केसरकर यांचं टेन्शन वाढलंय.. मात्र त्याचं नेमकं कारण काय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

कॅप्टन खरातच्या काळ्या कारनाम्यांचं बिंग फुटल्यानं रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला... मात्र आता एसआयटीनं राजकीय नेत्यांभोवती फास टाकायला सुरुवात केलीय...((माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढे आणि नराधम कॅप्टन खरातच्या व्यावसायिक संबंधाचा तपास केला जातोय..याच तपासात दीपक लोंढे नराधम खरातच्या सिन्नर परिसरात जमीन व्यवहारात सक्रीय असल्याचं समोर आलंय..))

एका बाजूला दीपक लोंढेच्या चौकशीमुळे केसरकरांचं टेन्शन वाढलं असतानाच संजय राऊतांनी नवा बॉम्ब फोडलाय... केसरकर शालेय शिक्षणमंत्री असताना कॅप्टन खरातच शिक्षण खातं चालवायचा, असा गौप्यस्फोट राऊतांनी केलाय..

खरंतर कॅप्टन खरातज्योतिषशास्त्राच्या नावानं महिलांना गंडा घालत त्यांच्यावर अत्याचार करायचा... याच काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड खरातचा ऑफिसबॉय नीरज जाधवने केला... तब्बल 100 पेक्षा जास्त व्हिडीओ समोर आलेत..एवढंच नाही तर याच भोंदूबाबासोबत राजकीय नेत्यांची उठबस सुरु असल्याचही समोर आलंय... आता एसआयटीनं दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची चौकशी सुरु केल्यानं केसरकरांचं टेन्शन वाढलंय..याबाबत केसरकरांनी प्रतिक्रिया दिलीय..

चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर आता राऊतांनी शिंदेसेनेच्या दीपक केसरकरांच्याही हकालपट्टीची मागणी केलीय... त्यामुळे चाकणकरांनंतर आता केसरकरांचीही विकेट जाणार का? आणि एसआयटी चौकशीत कॅप्टन खरातसोबतचं आणखी कुणाकुणाचं कनेक्शन समोर येणार... याकडेच राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणच्या हल्ल्यांमागे चीनचा हात ? इराण-अमेरिका युद्धात चीनची उडी ?

खरातच्या दरबारी बडे-बडे अधिकारी; अटकेच्या आधी भोंदूबाबासोबतच्या बैठकीत ते सरकारी अधिकारी कोण? स्पेशल रिपोर्ट

Sunday Horoscope : प्रेमसंबंध सुधारतील, आर्थिक लाभ होईल; कर्कसह ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Maharashtra Live News Update: अखेर ७ तासानंतर अशोक खरातची SIT चौकशी संपली

LPG Crisis: राज्यांसाठी LPG कोटा ५० टक्क्यांनी वाढवला; स्थलांतरित मजुरांना ५ किलोचे सिलिंडर मिळणार, मोदी सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT