Ashok Chavan Saam TV
महाराष्ट्र

Ashok Chavan : भाजप खासदार अशोक चव्हाण मनोज जरांगेच्या भेटीला; ताफा दूर थांबवून साध्या वाहनात पोहचले

Ashok Chavan Meets Manoj Jarange Patil : मनोज जारंगे पाटील गेवराई तालुक्याचा दौरा करून आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी एका साध्या स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लक्ष्मण सोळुंके

Jalna :

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल रात्री उशिरा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जंरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी अशोक चव्हाण यांनी आपल्या गाड्यांचा ताफा 15 किलोमीटर दूर ठेवला होता. रात्री उशिरा साडेबाराच्या सुमारास मनोज जारंगे पाटील गेवराई तालुक्याचा दौरा करून आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी एका साध्या स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.

या दरम्यान जरांगे पाटील आणि त्यांच्याशी सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाण यांनी मनोज जारंगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर आता मनोज जरांगे पाटील यांनी 900 एकरमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं आव्हान केल्यानंतर राजकीय नेत्यांना अंधारात भेट घेण्याची वेळ का आली आहे? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

मात्र या भेटीदरम्यान काय चर्चा झाल्या याबाबत कोणतीही माहिती सामोर आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा होऊ लागली आहे. भाजप खासदार अशोक चव्हाणांनी मध्यस्तीसाठी जरांगेंची भेट घेतली असावी अशाही चर्चा होत आहेत.

अंतरवाली सराटीत सहा कोटी मराठ्यांची 900 एकर जागेवरील सभेसाठी होणार चर्चा

सगेसोयरे शब्दांच्या अंमलबजावणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यासाठी अंतरवाली सराटीत 14 राज्यातील मराठ्यांची बैठक होणारे. कॅबिनेट बैठकीत सरकारने सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी अशी शेवटची विनंती जरांगे पाटील यांनी सरकारला केलीय. तसेच माझ्या नादी लागलात तर तुमचा राजकीय सुरडाच साफ करू, असा इशारा देखील जरांगे यांनी फडणवीसांना दिलाय. त्यामुळे काल रात्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT