Ashok Chavan On Maha Vikas Aghadi Seat Sharing saam tv
महाराष्ट्र

Ashok Chavan: महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? अशोक चव्हाण यांनी दिली महत्वाची माहिती

Maha Vikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल, याबाबत काँगेस नेते अशोक चव्हाण यांनी महत्वाची माहिती दिली.

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी, नांदेड

Ashok Chavan On Maha Vikas Aghadi Seat Sharing:

महाविकास आघाडीत अद्याप लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही, असं काँगेस नेते अशोक चव्हाण म्हणाले. जोपर्यंत काँगेसचे केंद्रिय श्रेष्ठी निर्णय देत नाहीत तोपर्यंत आम्हाला थांबाव लागणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

वंचित प्रमूख बाळासाहेब आंबेडकर यांनी 12 जागांची मागणी केली, याबाबत काँगेस नेते अशोक चव्हाण यांना विचारले असता, प्रत्येक जण आपआपल्या इच्छेनुसार जागा मागत आहेत. संजय राऊत यांची 23 जागांची ईच्छा आहे. प्रकाश आंबेडकर यांची 12 जागांची इच्छा आहे. शरद पवार गटाची काही इच्छा असेल, अशी गोळाबेरीज केली तर आकडा 48 च्या वर जाईल, असं अशोक चव्हाण म्हणाले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिंकण्याची परिस्तिथी कोणाची आहे, कोण निवडून आणू शकतो, हेच जागा वाटपाच समीकरण असणार आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले. (Latest Marathi News)

दिल्लीच्या केंद्रिय समीतीसोबत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली, समितीने महाराष्ट्राची राजकिय परिस्तिथी जाऊन घेतली असं ते म्हणाले. राज्यातील कोणत्या जागा सोईच्या याबाबत चर्चा झाल्याचे. चव्हाण म्हणाले, राजकीय समीकरनाची माहिती आम्ही केंद्रिय समितीला दिली. बाकीच्या पक्षाशी बोलणी अजून सुरू आहे. त्यांची मत जाणून घेतल्यानंतर निर्णय होईल.

दे भारत रेल्वेवर बोलताना ते म्हणाले, जालना ते मुंबई अशी वंदे भारत रेल्वे सुरू झाली. मात्र वंदे भारत ही गाडी नांदेडपासून का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नांदेड - मुंबई , नांदेड - हैदराबाद अशी का नको, असं अशोक चव्हाण म्हणाले. राज्यातून गुजरातला जाण्यासाठी 54 विमान आहेत, पण आपल्या राज्यातून आपल्याच राज्यात जाण्यासाठी फक्त 16 विमान आहेत, हे नियोजन चुकीचं असल्याचं चव्हाण म्हणाले. केंद्राचे लक्ष मराठवाड्याकडे नाही, असा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

Weight Loss Tips: वजन झटपट कमी करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा; महिनाभरात कपडे होतील सैल

SCROLL FOR NEXT