Ashish Shelar Saam Tv
महाराष्ट्र

Ashish Shelar : वरळी विधानसभेचा राजीनामा द्यावा मग...; आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजवर आशिष शेलारांच प्रत्युत्तर

पालिकेत देखील आमची सत्ता येईल, असे शेलार म्हणाले.

सुरज सावंत

Ashish Shelar : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठं आव्हानं केलं आहे. हिंमत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात वरळीत उभं राहा. निवडून कसं येता ते बघतोच, असं ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. अशात आशिष शेलारांनी देखील आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Ashish Shelar News)

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेचा राजीनामा द्यावा मग आम्ही बघू..., असं प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे.

आई भराडी देवीचे दर्शन घेतल्यावर आज माध्यमांशी संवाद साधताना शेलारांनी असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी महापालिकेविषयी बोलताना ठाकरे गटावर खरमरीत टीका केली आहे. 25 वर्ष पालिकेच्या तिजोरीवर ज्या भुरट्ंयानी दरोडा घातला त्यांच्या हातून पालिका जाणार आहे. यासाठी आई भराडी देवीचे आम्ही दर्शन घेतले आहे, असं शेलार यांनी म्हटलं.

आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. यावर देखील शेलारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे बजेट ठेकेदार आणि कंत्राटदारांसाठी नाही. हे बजेट चांगले आहे याचे समाधान वाटते. पालिकेत देखील आमची सत्ता येईल, असे शेलार म्हणाले.

तसेच संजय राऊत यांच्यावर शेलारांनी टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत अजूनही राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या बाजूने आहेत. जे बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत ते शिंदेसोबत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT