Ashish Deshmukh Saam Tv
महाराष्ट्र

Ashish Deshmukh News: देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा : आशिष देशमुख

Ashish Deshmukh: देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत ही राज्यभरातल्या भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं विधान आशिष देशमुख यांनी केलंय.

संजय तुमराम साम टीव्ही चंद्रपूर

Ashish Deshmukh on Fadnavis:

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, ही देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलेली इच्छा त्यांच्या मनाचा मोठेपणा दर्शविते. त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनाही सामावून घेतले आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत ही राज्यभरातल्या भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. असे सुतोवाच माजी आमदार भाजप नेते आशिष देशमुख यांनी चंद्रपुरात केले. तर २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदापासून रोखण्यासाठी उद्धव ठाकरे कारणीभूत असल्याचेही देशमुख म्हणाले.(Latest News)

आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण मुख्यमंत्री पदावरून या तीन पक्षांच्या महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता दाट होतेय. त्याच कारण आहे मुख्यमंत्रीपदावरुन करण्यात येणारी दावेदारी. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नव्यानं सामील झालेले अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्रीचे बोर्ड वेळोवेळो निरनिराळ्या शहरात लागत असतात.

त्यात पुढील निवडणुका ह्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात लढवण्यात येतील आणि तेच पुढेही मुख्यमंत्री असतील, असा दावा शिवसेनेचे नेत्यांकडून करण्यात येत आहे. यासर्व गोंधळामुळे विधानसभेच्या निवडणुका जरी सुरळीत पार पडल्या तरी मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन माजेल असं दिसतंय.

एका वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात, असं विधान केलं. त्यांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचं असेल तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, असं सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह इतर आमदार निलंबित होऊन त्यांच्याजागी अजित पवार हे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

त्यावरून देवेंद्र फडणवीस यांना या मुलाखतीत सहा महिन्यात अजित पवार मुख्यमंत्री होतील, या चर्चेबाबत विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, सहा महिन्यांत कोणत्याही गोष्टी बदलत नाहीत.

अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचं असेल, तेव्हा त्यांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू. जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू.” अंस विधान केलं. परंतु भाजपमधील नेते आणि कार्यकर्त्यांना फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटतं आहे. यामुळे वादविवाद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान आशिष देशमुख यांनी जातीनिहाय जनगणनाविषयीही आपलं मत मांडलं. बिहारच्या धर्तीवर राज्यातही जातनिहाय जनगणना व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनुकूलता दर्शविलीय. यामुळे राज्यातील ओबीसी प्रवर्गाची स्थिती पुढे येणार असल्याचं मत आशिष देशमुख यांनी मांडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT