ashatai shinde to join congress soon  saam tv
महाराष्ट्र

Nanded Political News : अशाेक चव्हाणांसाठी धक्कातंत्र, भाजप खासदारांच्या बहिणीचे काँग्रेसच्या दिशेने पाऊल ?

Loha Kandhar Assembly Constituency : आशाताई शिंदे या आमदार श्यामसुंदर शिंदे यांची पत्नी असून भाजप खासदार प्रताप पाटील- चिखलीकर यांच्या बहीण आहेत.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded :

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (bjp leader ashok chavan) यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्या नंतर नांदेड जिल्ह्यातील राजकारणाचे गणिते पूर्णतः बिघडले आहे. काँग्रेस पक्षाला नांदेड (nanded congress) जिल्ह्यात मोठे खिंडार पडू लागले आहे. त्यातच काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी काही बड्या नेत्यांना पक्षात घेण्याची हालचाली सुरु झाल्या आहेत. (Maharashtra News)

नांदेड जिल्ह्यातील एक मोठ नाव लोहा- कंधार विधानसभेचे (loha kandhar assembly constituency) शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे (mla shamsundar shinde) यांच्या पत्नी शेकपाच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई (ashatai shinde) यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्याबाबतची सूत्रांनी खात्रिशिर माहिती दिली.

आशाताई शिंदे या भाजपाचे खासदार प्रताप पाटील- चिखलीकर (mp pratap patil chikhalikar) यांच्या भगिनी आहेत. आशाताई यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश झाल्यास येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत बहीण भावाची लढत हाेईल अशी शक्यता नाकारता येत नाही. या सर्व हालचालींमुळे सध्या नांदेड जिल्ह्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

SCROLL FOR NEXT