CM Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2024: मुख्यमंत्र्यांना विठुरायाच्या शासकीय पूजेचा नैतिक अधिकार राहिला नाही, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

CM Eknath Shinde: 'मराठा आरक्षणात फसवणूक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी घरातूनच शासकीय विठ्ठल पूजा करावी.', असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

Priya More

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चा संघटना (Maratha Kranti Morcha) आक्रमक झाली आहे. 'मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विठुरायाच्या शासकीय पूजेचा नैतिक अधिकार राहिला नाही.', असे मत मराठा क्रांती मोर्चा संघटनेने व्यक्त केले आहे. 'मराठा आरक्षणात फसवणूक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी घरातूनच शासकीय विठ्ठल पूजा करावी.', असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केले आहे. मराठा क्रांती मोर्चाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.

पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाची मुख्यमंत्र्याच्या हस्ते शासकीय पूजा केली जाते. यावेळी मात्र पंढरपूरच्या विठुरायाच्या पूजेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे शासकीय पूजेला न येता घरात बसूनच पांडुरंगाची पूजा करावी.', असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमत्र्यांना केले आहे. कारण मराठा आरक्षणाची मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात २६ जानेवारी २०२४ रोजी नवी मुंबई येथील वाशी येथे लाखोंच्या संख्येने मराठा बांधव महिला मुलांसह दाखल झाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेले एकही आश्वासन सहा महिने पूर्ण होऊन गेले तरी पूर्ण केले नाही. त्यामुळे अशी खोटी आश्वासने देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांची पूर्तता न करणाऱ्या खोटारड्या मुख्यमंत्र्यांनी मराठा बहुजन समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाची शासकीय पुजेला न येता घरातूनच पांडुरंगाची पूजा करावी., असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केले आहे. मराठा समाजाला फसवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विठुरायाच्या शासकीय पूजेचा नैतिक अधिकार राहिलेला नाही., असे मत त्यांनी व्यक्त केले आहे

आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्या आजही थांबलेल्या नाहीत. याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री आहेत असे मराठा समाज समजतो. तरी मुख्यमंत्र्यांना आपल्या दिलेल्या शब्दावर जरा तरी विश्वास असेल तर त्यांनी पंढरपुरात शासकीय पूजेस येणं टाळावे, अशी मागणी राज्यातील सकल मराठा समाज करत आहे. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. दरम्यान, येत्या १७ जुलैला आषाढी एकादशी असून पंढरपुरामध्ये दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या हास्ते विठुरायाची शासकीय पूजा केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावर्षी विठुरायाची शासकीय पूजा करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

Maharashtra News Live Update: चांदवडच्या राहुडमध्ये घरफोडी, लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास

SCROLL FOR NEXT