Ashadhi Ekadashi CM Eknath Shinde Maha Puja Saam TV
महाराष्ट्र

Ashadhi Ekadashi Wari: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा; विठ्ठलनामाच्या गजराने पंढरपूर दुमदुमले

Ashadhi Ekadashi CM Eknath Shinde Maha Puja: 'अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली.

Satish Daud

Ashadhi Ekadashi CM Eknath Shinde Maha Puja: 'अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. या पूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, पुत्र श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यांच्यासह शिंदे कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसोबत अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला. भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) या दाम्पत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शासकीय महापूजा केली.

काळे दाम्पत्य हे गेल्या २५ वर्षापासून पंढरपूरची पायी वारी करतात. आज त्यांना महापूजेचा मान मिळाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते विठ्ठलाची ही दुसरी पूजा आहे. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाच्या (Ashadhi Ekadashi 2023) चरणी बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत. पाऊस चांगला पडू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असे साकडे घातले.

दरम्यान, विठुरायाच्या महापूजेसाठी एकनाथ शिंदे हे आपल्या कुटुंबासह बुधवारी रात्री उशीरा पंढरपुरात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश ख्याडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री दादा भुसे, यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी पंढरपुरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बुधवारी सायंकाळी पंढरपुरात दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांच्यासोबत वारकऱ्यांच्या रिंगणात फुगडी देखील खेळली होती

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT