आर्यनची उत्तुंग भरारी; ग्रीस गाजवून आला..! प्रदीप भणगे
महाराष्ट्र

आर्यनची उत्तुंग भरारी; ग्रीस गाजवून आला..!

बुद्धीबळ व्यक्तिरीक्त आर्यन जलतरण स्पधेतही भाग घेत असतो आणि जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय सुवर्णपदक सुद्धा मिळवलेले आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली : नुकत्याच ग्रीस देशात पार पडलेल्या ' जागतिक अंध बुद्धिबळ ऑलिंपियाड' स्पर्धेत डोंबिवली मधील आर्यन जोशी या मुलाने कांस्य पदक पटकावले आहे. आर्यन ने आपल्या उत्तुंग कामगिरीने देशास गौरव प्राप्त करून दिला आहे. सदर स्पर्धेत 22 देशातील शंभर पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता.

हे देखील पहा :

याआधीही आर्यन याने बरच्या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्यातही त्याला यश आले आहे. २०१८ साली पोलंड येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर अंध स्पर्धेत तो सहाव्या क्रमांकवर होता. आर्यन हा आता 19 वर्षाचा आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा आपला अभ्यास करत ऑनलाइन बुद्धीबळ हा खेळ खेळत होता.

आताच्या यशाचे श्रेय त्याने आपले शिक्षक रघुनंदन गोखले, शिक्षक निरंजन नवळगुंद, पालक, पोद्दार कॉलेज यांना आणि ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड या संस्थेला दिले आहे. बुद्धीबळ व्यक्तिरीक्त आर्यन जलतरण स्पधेतही भाग घेत असतो आणि जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय सुवर्णपदक सुद्धा मिळवलेले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT