घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरटा जेरबंद विजय पाटील
महाराष्ट्र

घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरटा जेरबंद

घरफोडी, दुचाकी चोरीतील सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केल आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

विजय पाटील

सांगली : घरफोडी, दुचाकी चोरीतील सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने Squad जेरबंद केल आहे. आकाश सतिश कवठेकर (वय- २४) असे संशयीताचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, २ दुचाकी, लॅपटॉप Laptop असा २ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर कुपवाड Kupwad परिसरातील ३ गुन्ह्याचा छडा लावण्यात आला आहे. Arrested for burglary 

सांगली Sangli व मिरज Miraj भागात जबरी चोरी, घरफोडी आणि मोटर सायकल चोरी या सारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एलसीबीने LCB एक पथक तयार केले आहे. याबाबत, माहिती घेत असताना सुतगिरणी टेकडीवर कमी दरामध्ये सोने विक्री करण्यासाठी एकजण थांबला आहे. अशी माहिती पथकास मिळाली होती. पोलिसांनी Police छापा टाकून, विना नंबर प्लेटची मोटर सायकलीवर बसलेल्या एकास ताब्यात घेतले आहे.

हे देखील पहा-

त्याच्या जवळ दुचाकीची कागदपत्रे आणि गाडी मालकाबाबत विचारणा केली असता, उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला, तर गाडीच्या हॅन्डलला अडकविलेली पिशवीत  एक काळया रंगाचा कंपनीचा लॅपटॉप आणि चार्जर मिळून आला. त्यानंतर त्याची पोलिसांनी झडती घेतली असता, त्याच्याकडे सोन्याचे एक नेकलेस, गंठण मिळून आले आहे. त्याच्या जवळील विना नंबरची मोटर सायकल, लॅपटॉप व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. Arrested for burglary

पोलिसांनी चौकशी केले असता, त्याने ४ ते ५ दिवसापुर्वी कुपवाड येथून दुचाकी चोरली आहे. तर कुपवाडमध्ये एक बंद शेड फोडून त्याठिकाणांवरील लॅपटॉप व चार्जर चोरलेले होते. कुपवाडमध्ये भारत सुतगिरणी जवळ बिल्डिंगच्या पार्किंग मधून एक मोटर सायकल चोरलेचे सांगितले आहे. पुढील तपास करण्यासाठी कुपवाड एमआयडीसी MIDC पोलिस ठाणे येथील गुन्हा वर्ग करत आहे. Arrested for burglary

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT