अमर घटारे
Amtravati News : संभाजी भिडे यांनी 27 जुलै रोजी अमरावतीमध्ये महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचे पडसाद आता उमटत आहेत. भाजपने संभाजी भिडे यांच्याशी आमचा भाजपचा काही संबंध नाही, असे सांगितले असले तरी आता खुद्द भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी या वादात उडी घेतल्याचे दिसून येत आहे.
अमरावतीत संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी भिडेंविरोधात आंदोलन केलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून संभाजी भिडे समर्थकांनी अमरावतीच्या कोतवाली पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत यशोमती ठाकूर यांना अटक करण्याची मागणी केली. तशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे.
भिडे समर्थकांनी यशोमती ठाकूर व काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. दरम्यान आता यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडेंविरोधात एकही वक्तव्य करू नये. भिडे गुरुजी यांची बदनामी करू नये. अन्यथा जशाच तसं उत्तर देऊ, अशी भूमिका भिडे समर्थकांनी घेतली.
काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह भाजप खासदार अनिल बोंडेही अमरावतीच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. (Political News)
आमदार यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याचा शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. यशोमती ठाकूर यांना अटक करण्याची मागणी त्यांनीही केली. (Latest Marathi News)
संभाजी भिडे प्रकरणात आता शिवप्रतिष्ठानसोबत तक्रार देण्यासाठी अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्तेही पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी बोंडे यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.