drowned , bhandara, wainganga river SaamTv
महाराष्ट्र

Bhandara : वैनगंगा नदीत आढळला खराडीतील युवतीचा मृतदेह

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.

अभिजीत घोरमारे

Bhandara : भंडारा शहराजवळच्या वैनगंगा नदीत (wainganga river) एका युवतीचा मृतदेह मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तरंगताना आढळून आला आहे. ही युवती खराडी येथील असून तिच्या मृत्यू प्रकरणी पाेलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नाेंद केली आहे.

या घटनेबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधित युवतीचे नाव अर्पिता धनराज गजभिये (arpita gajbhiye) असे आहे. ती खराडी येथे राहते. भंडारा (bhandara) येथील एका लॅबमध्ये ती दररोज प्रशिक्षणासाठी येत होती. नेहमीप्रमाणे प्रशिक्षणासाठी जात असल्याचे सांगून ती घरा बाहेर पडली.

दरम्यान सायंकाळपर्यंत ती घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांनी शाेधा शाेध केली. एका युवतीचा मृतदेह वैनगंगा नदीच्या लहान पुलाजवळ तरंगताना काही नागरिकांना आढळला हाेता. हा मृतदेह अर्पिताचा हाेता. याप्रकरणी भंडारा शहर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्यामागे आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. तिच्या या दुर्देवी मृत्युने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT