सांगलीमध्ये शस्त्र तस्करी करणारी टोळी जेरबंद; देशी बनावटीच्या पिस्तूलांसह 6 जिवंत काडतुसे जप्त! विजय पाटील
महाराष्ट्र

सांगलीमध्ये शस्त्रांची तस्करी करणारी टोळी जेरबंद; देशी बनावटीच्या पिस्तूलांसह 6 जिवंत काडतुसे जप्त!

गौस उर्फ निहाल, सुरेश हत्तेकर, आणि तौफिक शेख या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल सहा जिवंत काडतुसे आढळून आली.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : शस्त्र तस्करी करणारी एक टोळी मिरज ग्रामीण पोलिसांनीMiraj Rural Police जेरबंद केली आहे. यामधील तिघांना अटक करत तीन देशी बनावटीचे पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सदर टोळी शस्त्र तस्करी करण्यासाठी आली असता मिरज पंढरपूर रोडवरील तानंग फाट्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे. Arms smuggling gang arrested in Sangli

हे देखील पहा-

मिरज ग्रामीण पोलीसांच्याकडून शस्त्र तस्करी करणारी एक टोळी गजाआड करण्यात आली असून मिरज-पंढरपूर रोड Miraj Pandharpur Road वरील तानंग फाटा या ठिकाणी काही इसम शस्त्र विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून चार चाकी वाहनाजवळ थांबलेल्या गौस उर्फ निहाल, सुरेश हत्तेकर, आणि तौफिक शेख या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल सहा जिवंत काडतुसे आढळून आली.

शस्त्र आढळल्यावरती पोलिसांनी या तिघांनाही अटक करत त्यांच्या ताब्यातील शस्त्र व चारचाकी वाहन असा एकूण 3 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी या तिघांच्याकडे पिस्तूल कुठून आणली आणि ती कोणाला विक्री करण्यात येत होती. याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू केली आहे तसेच त्या टोळीबाबत सर्व माहिती तसेच त्यांच्या संपर्कात असणाऱ्या इतर शस्त्र तस्करी आणि विक्री करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आरोपींची कसून चौकशी सुरु करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT