Latur Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Latur : लातुरात सशस्त्र दरोडा; पिस्तुलाचा धाक दाखवून ३ कोटींची लूट

चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून २ किलो ४३६.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख २ कोटी २५ लाख असा २ कोटी ९८ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दिपक क्षीरसागर

लातूर : लातूर (Latur) शहरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली. कातपूर रोडवरील कन्हैयानगर येथील एका व्यक्तीच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत दरोडा टाकला. चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून २ किलो ४३६.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख २ कोटी २५ लाख असा २ कोटी ९८ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एरव्ही शांत असलेल्या लातूर शहरात एकच खळबळ उडाली. (Latur News Today)

कातपूर रोडवरील कन्हैयानगर येथील आक राजकमल अग्रवाल यांच्या घरात पहाटे २.३० च्या सुमारास ५ चोरट्यांनी प्रवेश केला. किचन रूममधून घरात आलेल्या चोरट्यांनी तळघरात आकाश अग्रवाल यांचे वडील झोपले होते. त्यांच्या बेडरूमध्ये प्रवेश करत चोरट्यांनी कत्ती, चाकू, पिस्टलचा धाक दाखवून रोख २ कोटी २५ लाख रूपये आणि २ हजार ४३६.५ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.

तत्पूर्वी घरातील सर्वांना एका रूममध्ये कोंडले आणि चोरटे कंपाऊंडवरून उडी मारून पळून गेले.या घटनेची माहिती मिळताच विवेकानंद पोलिस ठाण्याचे प्रभारी खंदारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

सदर घटनेच्या संदर्भाने डॉगस्कॉड पथकावरोबरच घटना स्थळाचे ठसेही घेण्यात आले. या प्रकरणी आकाश अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर हे करीत आहेत

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT