Kalava News  Saam TV
महाराष्ट्र

कळव्यातील मुस्लीम बांधवांच्या निर्णयाचे कौतुक; स्वतः उतरवले मशिदीवरील भोंगे

महत्मा फुले नगर येथील मशिदीचे ट्रस्टी पोलीस ठाण्यात आले आणि आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्पेश गोरडे

कळवा: जातीय सलोखा टिकवण्यासाठी आणि कुठली सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी कळव्यामधील महात्मा फुले नगर येथील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत आपल्या मशिदीवरील भोंगे उतरवले आहेत. कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांनी हे भोंगे उतरवले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन करून कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी मौलानांची बैठक घेतली. त्यावेळी कळव्यातील महत्मा फुले नगर येथील मशिदीचे ट्रस्टी पोलीस ठाण्यात आले आणि आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

११ वाजता भोंगे स्वतःहून उतरवणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या उपस्थितीत मलंग गोकाक, फैयाज गोकाक, कदर बिजपुरे, इब्राहीम शेख यांनी स्वतः मशिदीवरील तीन भोंगे उतरवले. या मुस्लीम बांधवांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पोलिसांनी कौतुक केले आहे. आणि त्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन केले आहे. असाच आदर्श स्वतःहून सर्वांनी घ्यावा असे आवाहन यावेळी कळव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी केले आहे. ही मशीद बांधून २४ वर्ष पूर्ण झाली आहेत. या आधी ही मशीद हरदास नगर येथे होती.

पुनर्वसन दरम्यान आपले पूर्वज मुरादभाई सोलापूर यांच्या नेतृत्वाझाली ही मशीद या ठिकाणी बांधण्यात आली असल्याचे फैयाज गोकाक यांनी सांगितले. जातीय सलोखा टिकवण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून घेतला गेलेल्या या निर्णयाचा सर्वच कळवा वासियांकडून कौतुक केल जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT