साईबाबा संस्थान सीईओ पदी भाग्यश्री बानायत यांची नियुक्ती गोविंद साळुंके
महाराष्ट्र

साईबाबा संस्थान सीईओ पदी भाग्यश्री बानायत यांची नियुक्ती

कान्हूराज बगाटे यांच्या जागी नियुक्ती

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

शिर्डी - साईबाबा Saibaba संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नागपूर Ngapur येथील भाग्यश्री बानायत-धिवरे Bhagyashree Banayat-Dhiware यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाग्यश्री या उद्योग विभागाच्या संचालक होत्या. भाग्यश्री यांची शिर्डीचे सीईओ कान्हूराज बगाटे Kanhuraj Bagate यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. बगाटे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयानेही कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती नियमबाह्य ठरवली होती.

हे देखील पहा -

सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी काही दिवसांपूर्वी याचिका दाखल करत बगाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. या याचिकेत पोलीस प्रशासनाला उच्च न्यायालयाने नोटीस बजावली असून बगाटे यांच्या जागी आता भाग्यश्री बानायत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असले तरी मात्र बगाटे अद्यापही नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

शिर्डीत कान्हूराज बगाटे यांच्या बदलीनंतर फटाके देखील फोडण्यात आले. मात्र हे फटाके कोणी फोडले हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत फटाके फोडले असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. इतिहासात प्रथमच एखाद्या अधिकाऱ्याच्या बदलीनंतर असे फटाके फोडण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

Maharashtra Live News Update : उर्वरित नगरपरिषद नगरपंचायतीसाठी आज मतदान

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

SCROLL FOR NEXT