Dhananjay Munde saam tv
महाराष्ट्र

Beed : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारावेत; धनंजय मुंडेंची मागणी

वेबसाईट हँग आणि सर्व्हर डाऊनमुळे नामनिर्देशन करण्यापासून एखादा उमेदवार वंचित राहू शकतो - धनंजय मुंडे

विनोद जिरे

बीड - निवडणूक विभागाची वेबसाईट सतत हँग होत असल्याने आणि सर्व्हर डाऊनमुळे, नामनिर्देशन करण्यापासून एखादा उमेदवार वंचित राहू शकतो. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ट्विट करून केली आहे. त्याचबरोबर मुंडे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना मागणीचे पत्रही पाठवले आहे.

धनंजय मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटलं की, राज्यात 7751 ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून,निवडणूक आयोगाची वेबसाईट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाऊन होणे यामुळे अर्ज सादर करण्यात उमेदवारांना अडचणी येत असल्याने उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावेत.

शुक्रवार दि.02 डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. ही बाब विचारात घेत राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याबाबत संबंधित यंत्रणांना तात्काळ आदेश द्यावेत अन्यथा अनेक इच्छुक उमेदवार हे नामनिर्देशन सादर करण्यापासून वंचित राहू शकतात. याबाबत मी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्रही पाठवले आहे. तात्काळ याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून केले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्यात 800 रुपयांची तर चांदी 1000 ची घसरण

Tula Pahta Movie: पहिलं प्रेम म्हणजे न विसरता येणारी आठवण...; 'तुला पाहता' उलगडणार चित्रपटातून तरल प्रेमाची अनवट कहाणी

8th Pay Commission: शिपाई ते IAS अधिकारी; आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

Railway Rules : रेल्वेचा मोठा निर्णय! ट्रेनमधील मिडल बर्थ सकाळच्या सुमारास राहणार बंद, काय आहे या मागचं कारण?

दरवाढीचा भडका! डिझेल २५ रुपये, तर पेट्रोल इतक्या रूपयांनी महागण्याची शक्यता; पेट्रोलियम मंत्री नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT