आता बीड जिल्ह्याच्या सीमेवर होणार अँटिजेन टेस्ट - धनंजय मुंडे विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड जिल्ह्याच्या सीमेवर होणार अँटिजेन टेस्ट - धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज आढावा बैठक घेतली आहे.

विनोद जिरे

बीड - बीड जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज आढावा बैठक घेतली आहे. या बैठकी दरम्यान पालकमंत्री मुंडे यांनी संबंधित आरोग्य प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या आहेत.

हे देखील पहा -

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. दररोज जवळपास 200 हुन अधिक रुग्ण निघत आहेत. आज दिवसभरात 180 नव्या रुग्णांची वाढ झालीय. त्यामुळेच दिवसेंदिवस वाढणारी रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी, नगर जिल्ह्याशी संलग्न असणाऱ्या आष्टी, पाटोदा, आणि शिरूर तालुक्यात प्रशासनाने कडक निर्बंध आणले आहेत.

या तालुक्याचा संबंध थेट नगर जिल्ह्याशी येत असल्याने, आरोग्य प्रशासनाच्या वतीने जिल्ह्याच्या सीमेवर अँटिजेन तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल. असा विश्वास पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलाय. त्याबरोबरच तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य प्रशासन सज्ज असून लसीकरण वाढविण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी इंदापूर तहसीलदारांना निवेदन...

... तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद! मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; शिंदें-फडणवीसांवर सर्वात गंभीर आरोप

Kitchen Safety Tips: तुमच्या किचनमध्ये लपलेत आरोग्याचे 3 शत्रू; आजच फेकून द्या कचऱ्यात

जेवणानंतर पोट फुगतं अन् ढेकर येतात; 5 चुका आजच टाळा, आठवड्याभरात फरक पाहा

Maharashtra Government : सरकारचा मोठा निर्णय! मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी ४ GR जारी; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT