Bhandara Crime Saam TV
महाराष्ट्र

'त्या' बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीसोबत यापूर्वीही घडलं होतं भयानक, साकोलीच्या जंगलात...

काही दिवसांपुर्वी भंडाऱ्यात (Bhandara District) एका अल्पवयीन मुलीवर धावत्या ST बसमध्ये बलात्कार केल्याची घटना उघड झाली होती.

अभिजीत घोरमारे

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे धावत्या एसटी बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने यापूर्वीही तिच्यावरती एका जंगलात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आता पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

भंडाऱ्यात (Bhandara) एका अल्पवयीन मुलीवर धावत्या ST बसमध्ये बलात्कार केल्याची घटना उघड झाली होती. पीडित मुलीला नागपूरला (Nagpur) फिरायला घेऊन जायच्या बहाण्याने आरोपी राजेश मडावी याने तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी CCTV च्या साह्याने आरोपीला अटक केल्यानंतर मंगळवारी रात्री साकोली ते नागपूर प्रवासादरम्यान अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे उघड झाले होते.

हे देखील पहा -

या प्रकरणात साकोली तालुक्यातील बोधरा येथील राजेश मडावी याला अटक केली दरम्यान, आरोपीने धावत्या बसमध्ये तिच्यावर अत्याचार केला होता हे आरोपीसह मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यावर सिद्ध झालं होतंच. मात्र, या प्रकरणामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, राजेशने तिच्यावर यापूर्वी साकोली तालुक्यातील एका जंगलात नेऊन बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. आता पोलिस बसस्थानकावरील सीसीटीवी वरुन अधिक तपास करीत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

Maharashtra Politics : ठाकरेंना रोखण्यासाठी फिल्डिंग? एकनाथ शिंदेंचा अमित शाहांपुढे सीएमपदाचा प्रस्ताव?

Sanjay Gaikwad : कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणं भोवलं, संजय गायकवाडांना दणका; अखेर पोलिसांत गुन्हा, VIDEO

SCROLL FOR NEXT