Crime News saam tv
महाराष्ट्र

Pune News: दौंड पुन्हा हादरलं! काल सात जणांच्या हत्येचं गूढ उकललं; तिथेच आज आणखी एक मृतदेह आढळला

यवतमध्ये भीमा नदी पत्राच्या विरुद्ध दिशेला आणखी एक मृतदेह सापडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुण्यातील दौंडमधील यवत गावात काल एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला असून कौंटुबिक वादातून ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. मात्र यवतमध्ये आणखी एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

यवतमध्ये भीमा नदी पत्राच्या विरुद्ध दिशेला आणखी एक मृतदेह सापडला आहे. मृतदेह स्थानिक रहिवाशाचा असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. हत्याकांडाच्या घटनेशी याचा संबंध आहे का नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही.

पुण्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. भीमा नदीत पात्रात सात जणांचे मृतदेह आढळले होते त्यानंतर या सर्वांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र या सर्वांची आत्महत्या नसून हत्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मोहन पवार, संगिता पवार, शाम फुलवरे, राणी फुलवरे, रितोश भैय्या, छोटू, कृष्णा अशी मृत्यू झालेल्या सात जणांची नावं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेले 130 मोबाईल मालकांच्या हाती

SCROLL FOR NEXT