Anna Hazare Saamtv
महाराष्ट्र

मंदिरे उघडण्यास सरकारला अडचण काय? अण्णा हजारे संतापले...

जिथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडतात अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले ? असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संतापले.

सचिन आगरवाल

अहमदनगर : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे ? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का ? जिथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडतात अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले ? असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संतापले.

हे देखील पहा -

मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितेने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे धोरण बरोबर नसून १० दिवसात जर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर मोठे आंदोलन करा मी तुमच्या बरोबर राहील, असा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला.

नगरच्या मंदिर बचाव कृती समितीने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन राज्यातील बंद असलेली सर्व मंदिरे उघडण्यासाठी सरकार कडे पाठपुरावा करावा असे साकडे घातले. मंदिर बचाव कृती समितीचे प्रमुख वसंत लोढा यांच्या सह कार्यकर्त्यांनी अण्णा हजारे यांना निवेदन दिले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT