Breaking News Saam tv
महाराष्ट्र

Diwali 2022 : शेतकरी संकटात सापडल्यानं राज्यातील 'या' विभागाच्या दिवाळी सुट्टी रद्द; मंत्र्यांची घाेषणा

शेतकरी संकटात असल्याने त्याला मदत करणे ही आमची प्राथमिकता असल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Diwali 2022 : राज्यात लम्पी (lumpy skin disease) आजाराचा प्रादुर्भाव अचानक वाढला आहे. जनावरांना दुसरा ढोस देण्याबाबत विचार सुरू आहे. येत्या २४ तारखेला औरंगाबाद जिल्ह्यात आणि त्यानंतर बुलढाणा दौरा करणार असल्याचे स्पष्ट करीत राज्यातील दुग्ध आणि पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिका-यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याचे दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांनी दिेली. दिवाळीपेक्षा बळीराजाला मदत करण्यास आमची प्राथमिकता असल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले. (Breaking Marathi News)

मंत्री विखे पाटील म्हणाले जनावरांचे आठवडे बाजार, जनावरांची वाहतूक यावर निर्बंध आणले आहेत. राज्यात १०० टक्के लसीकरण झाले आहे. लम्पी आटोक्यात येत असतानाच अचानक प्रादुर्भाव वाढला आहे. जेथे तांडे आहेत तेथे‌ सुविधा नाहीत. बाहेर जनावरे चरण्यासाठी जात असल्याने प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी (farmers) संकटात असल्याने ही दिवाळी शेतक-यांसोबत करण्याच ठरवल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले.

दरम्यान दिवाळीपेक्षा बळीराजाला मदत करण्यास आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे राज्यातील दुग्ध आणि पशुसंवर्धन विभागाच्या सर्व अधिका-यांच्या सुट्टी रद्द करून नेमणुकीच्या ठिकाणी राहण्याच्या सुचना देण्यात आल्यात आहेत असेही विखे पाटील यांनी नमूद केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

SCROLL FOR NEXT