Anil Parab Latest Marathi News Saam Tv
महाराष्ट्र

Anil Parab : अनिल परब यांना मोठा दिलासा; दापोली रिसॉर्ट प्रकरणी अटकपूर्व जामीन

दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

Anil Parab News : दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना अखेर अटकपूर्व जमीन मंजूर केला आहे. खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन मंजूर केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथील साई रिसोर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांना अखेर अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनिल परब यांचे वकील अॅड सुधी बुटाला यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दोपोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी 420 अंतर्गत माजी मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी ९ नोव्हेंबर रोजी अंतरिम जामीन मिळाला होता, त्यानंतर खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात परब यांच्या अर्जावर सुनावली होती. याच प्रकरणी अखेर, आज शनिवारी मंत्री अनिल परब यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत परब यांच्या अटकेची मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT