Anil Singhania  Saamtv
महाराष्ट्र

Amruta Fadnavis Blackmail Case: मोठी बातमी! अनिल जयसिंघानीला ईडीकडून अटक

Anil JaySinghani Arrest: अहमदाबाद युनिटने 10,000 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यातून अटक केली.

Gangappa Pujari

Mumbai News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या आरोपाप्रकरणी सट्टेबाज अनिल जयसिंघानी याला इडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानी याला अंमलबजावणी संचालनालयाच्या अहमदाबाद युनिटने 10,000 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यातून अटक केली. जयसिंघानी हा 15 हून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी असून सट्टेबाजीच्या प्रकरणात त्याला तीनदा अटक झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी दाखल केलेल्या खंडणी आणि लाचखोरीच्या प्रकरणात त्यांच्या "बेकायदेशीर" अटकेला आव्हान देणारी बुकी अनिल जयसिंघानी यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती एएस गडकरी आणि न्यायमूर्ती पीडी नाईक यांच्या खंडपीठाने ही याचिका गुणवत्तेपासून वंचित असल्याचे सांगत फेटाळून लावली. जयसिंघानीला गुजरातमध्ये अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी फरार बुकी अनिल जयसिंघानीच्या मुंबई क्राईम ब्रांचनं अनिल जयसिंघांनीला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता अनिल जयसिंघानीला मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई सत्र न्यायालयाने पोलिसांना अनिल जयसिंघानीबाबतचे हे आदेश दिले होते. त्यानंतर आता त्याला इडीकडून अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो..₹१५०० बंद झाले का? योजनेत तुमचं नाव आहे का? एका क्लिकवर असं तपासा स्टेट्स

Maharashtra News Live Update: रूपाली चाकणकर एसआयटीसमोर हजर राहणार

Accident News : आजीसोबत बाहेर निघाला, वाटेत काळाचा घाला, कारच्या धडकेत नातवाचा मृत्यू; अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात

Fort In Maharashtra : भरती-ओहोटीच्या लाटांवर उभा असलेला 'हा' किल्ला पाहिलाय का? एकदा नक्की भेट द्या

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; वयाच्या ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT