anil deshmukh Saam Tv
महाराष्ट्र

Mondey Laundering Case: अनिल देशमुखांना आज दिलासा मिळणार?

ED ने न्यायालयाकडून नऊ जानेवारी पर्यंत रिमांड प्राप्त केला आहे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६७ (२) अन्वये जामीन मिळावा यासाठी मंगळवारी मुंबईतील विशेष न्यायालयासमोर अर्ज केला हाेता. आज (बुधवार) विशेष पीएमएलए न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या समाेर या अर्जावर सुनावणी हाेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. (money laundering case anil deshmukh moves special court to seek default bail)

अनिल देशमुख (anil deshmukh) हे सध्या मनी लाँडरिंग प्रकरणी (money laundering case) न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीनासाठी सादर केलेल्या अर्जात पहिला रिमांड वगळून ६० दिवस पुर्ण झाले आहेत. CrPC च्या कलम १६७ अंतर्गत जामीन बॉण्डसाठी दाखल केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

६० दिवसांचा वैधानिक कालावधी एक जानेवारीस संपेल हे न्यायालयास न सांगता गुप्तपणे प्रतिवादींनी न्यायालयाकडून नऊ जानेवारी पर्यंत रिमांड प्राप्त केला असे अर्जात नमूद करण्यात आले. कलम 167 CrPC मध्ये समाविष्ट असलेल्या वैधानिक दृष्टीकाेन लक्षात घेता अर्जदाराची ६० दिवसांच्या कालावधीपेक्षा अधिक कोठडीत ठेवणे कायद्याच्या दृष्टीने उचित ठरणार नाही. ६० दिवसांचा रिमांड पूर्ण झाल्यानंतरच वैधानिक जामीन मिळण्याचा अधिकार असल्याने या अर्जाला प्राधान्य द्यावे असे म्हटलं आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT